STORYMIRROR

Kiran Gadhave

Inspirational

4  

Kiran Gadhave

Inspirational

झेंडा

झेंडा

1 min
29.6K



त्या धुरांच्या लोटांची

धुरात घुसमटलेल्या श्वासांची

जात शोधायची का?


अजूनही न भांडता अवकाशभ्रमण

करताहेत मुक्तपणे

बिनडोक आहेत का पक्षी ?


मुक्त श्वासाचे आकाश

जमीन जाळा धुरात भकास

रंगा-रंगांत अस्तित्व शोधण्याच्या नादात

किती देह रक्ताने माखलेले?


झेंडा आमुचा उंच धरा रे

याचीच शर्यत सुरु आहे

कोण आमुचा गुरु आहे

रक्त सांडायला शिकवणारा?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational