बैल पोळा
बैल पोळा
अवघ्या राष्ट्राची शान
माझ्या कुनब्याची मान
जोडी खिल्लार शोभते
असे जीव की प्राण !!१!!
माझ्या अंगणाची शोभा
तुझ्या असण्याने सजली
सालभर बळीराजा उभा
काया घामानं भिजली !!२!!
दिवस एक तुझ्यासाठी
जरी असल राखला
जीव सदा तुझ्यावरी
तुला वरीसभर जपला !!३!!
आज तुझ्या कष्टाचे
ऋणानुबंध जपतो आहे
तुझ्या विना कोण मजला
तुझ्या पूजनाने सांगतो आहे !!४!!
सौ. उषा खंडागळे
