STORYMIRROR

Usha Khandagale

Inspirational

3  

Usha Khandagale

Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
145

डोंगर रांगानी नटून

दऱ्या खोऱ्यांचा साज लेऊन

कणखर असा उभा ठाकला

महाराष्ट्र माझा  !!१!!


ज्ञानोबा माऊलीच्या ज्ञानाने

 शिवरायांच्या पराक्रमाने 

पुनीत अन् प्रफुल्लित असा हा

महाराष्ट्र माझा   !!२!!


तुकोबा रायांचे महिमान

अन् नाथांचे गुणगान गानारा

 पावन ,पवित्र असा हा

महाराष्ट्र माझा !!३!!


संभाजीच्या बलिदानाने

अन् आंबेडकरांच्या कर्तुत्वाने 

नाद घुमविनारा कणखर असा हा

महाराष्ट्र माझा  !!४!!


सावित्री अन् अहिल्या देवी

इथेच लढल्या अन् झुंजल्या

साथ अन् उत्साह देणारा असा हा

महाराष्ट्र माझा    !!५!!


नद्या, धरण इथे हिरवाई सारी 

समृद्धअसे भूमी सगळ्यांना प्यारी

संस्कृती लाभली महान असा हा

महाराष्ट्र माझा  !!६!!


शाहू ,फुलेंच्या संघर्षाने

झेलली किती आव्हाने

नवयुग निर्माण करणारा असा हा

महाराष्ट्र माझा  !!७!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational