शाळापूर्व तयारी गीत
शाळापूर्व तयारी गीत
सात क्षमतांचा ( स्टॉल ) समावेश असलेले गीत
शाळा पूर्व तयारी गीत
जय देवी जय देवी
जय मराठी शाळा ,
लावते बालका शिकण्याचा लळा
पहिली पायरी नाव नोंदणी
करू औक्षण देऊ खेळणी
सेल्फी पॉईंट अन वजन उंची
घेऊ साऱ्यांनी सुदृढ बाळाची
दुसऱ्या पायरीला विकास करू
शारीरिक दम त्याच्यात भरू
दोरीच्या उड्या आणि चेंडू फेकणे
कोऱ्या चित्राला रंग भरणे
बौद्धिक विकास तिसऱ्या पायरीला
तुलना करू लहान मोठेपणाला
वस्तू क्रमाने लावणे झाले
उड्या मारत मुलं शाळेत आले
सामाजिक अन भावनिक विकास
चौथी पायरी असेल खास
कळेल बालका शाळेत आल्यास
अध्ययनाचा लागेल ध्यास
सांगेल परिवार आपला सारा
वाटणार नाही डोक्याला भारा
मराठी शाळेचे गोडवे गाईल
हसत खेळत मुल शाळेला येईल
विकास साधेल पाचवी पायरी
मराठी भाषा सुदृढ करी
चित्रांना पाहून बाळ बोलेल
अक्षरे ओळखून गोष्ट ही सांगेल
सहाव्या पायरीला गनन करेल
कमी न जास्त मणी बरणीत भरेल
कोणताही आकार झटकन सांगेल
ओळखून अंक वस्तूही मोजेल
देऊया बक्षीस सातव्या पायरीला
अभिनंदनाचे प्रमाणपत्र
आनंदी अन् उत्साही होईल
पूर्व तयारीचे पहिले सत्र
