STORYMIRROR

Atharv Mahajan

Tragedy Inspirational

3  

Atharv Mahajan

Tragedy Inspirational

पाबंदी

पाबंदी

1 min
312

स्वच्छ सुंदर आसमंत

आज वाटे त्याचीच घृणा,

बिभित्स प्रदुषणाने सार्‍या

वाहत्या कवितेतही वाहे करुणा


खळखळत्या पाण्यातही

येते कशी दुर्गंधी?

कवी तरी शोधावा कसा

जिथे कवितेसही पाबंदी


पावित्र्य संपूर्ण सरिता

आज नाल्यासह वाहते,

कधी वाहले शब्द सौंदर्याचे 

तिथेच आज किळस भावना येते


दुःखात आहे लेखणी

ना मिळे त्यासी काव्य धारा,

शांत भावी निसर्ग शोधतो

भूत अस्तित्वाचा गोडवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy