STORYMIRROR

Atharv Mahajan

Abstract Others

4  

Atharv Mahajan

Abstract Others

माझे पहिले प्रेम.

माझे पहिले प्रेम.

1 min
559

मान्य करतो मी 

पडलो आहे प्रेमात,

त्याच सुंदरतेच्या तिच्या

जी वसली माझ्या मनात.


कधीही येते जाग

कधी आठवणींत झोपलो तिच्या,

तिही येते कधीही

कधी शांत वेळी रात्रीच्या.


तिचं आहे प्रियसी माझी 

जी नवरसांचे गीत गाते,

शरीर स्वत:चे वृत्त मानूनी

ती युगे युगे मनात जगते.


आत्मा असतेच जन्मासाठी

म्हणाल,तिची आत्मा अशी कुठे?

बघता जमीनी तर क्षणांत आकाशी

असतेच,तुमची पाऊले पडती जेथे.


बेधुंद होती सारी दिशा

सोबत जेव्हा ती असते,

मीच माझा राहत नाही

जातो कुठेही,ती फक्त नेत असते.


अलंकार आहे ह्रदय तिचे 

नवरस तिचे सहस्त्र भाव

शब्दच तिचे प्राण, रक्त, वायु.

अखंड पाऊस आहे ती,

मज वाटे फक्त चिंब भिजावे त्यात.


'कविता' हे नाव आहे तिचे

कविता हा आभास आहे तिचा

स्वयंपुर्ण आहे तिच स्वत:

तिला येतो तो निव्वळ भास आहे माझा.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract