'ती पहाट' अजून उगवली नाही...
'ती पहाट' अजून उगवली नाही...
मनाच्या आसमंतातली
भरून घेण्या तळी,
त्या डोळ्यांत शोधतो आहे
ती पहाट अजून उगवली नाही.
सहस्त्र नभींच्या भिंतींमधली
ती खिडकी अल्हाददायी वाऱ्याची,
खोलता दिसतो आहे अंधार
सोबत मूठभर चांदणी प्रकाशाची.
त्या चांदण्यांस छेद देई
अस्तित्वा तो चंद्र मात्र राही,
ना प्रखरतेच्या आत, ना अंधारतेच्या अधीन
ती पहाट अजून उगवली नाही.
ती पहाट म्हणजे निर्मळ साधे सुख आहे
ते डोळे तो चांदनी प्रकाश
म्हणजे सौख्य चिन्हे मनातली
तोचि सुख शोधतो आहे,
म्हणता ती पहाट अजून उगवली नाही.
