STORYMIRROR

Atharv Mahajan

Romance Fantasy Others

3  

Atharv Mahajan

Romance Fantasy Others

मृद्गंध

मृद्गंध

1 min
255

मृद्गंध पावसाचा,

अजुनी अंबरात आहे

माझ्या हृदयी स्पंदनात तू,

आजही खोल अंतरात आहे


आजन्म खुणावते मजला,

ती तुझीच आस आहे

तुझ्या आठवणींनी दाटलेला,

तो श्वासही माझाच आहे


मृद्गंधाच्या वाटेवरचा,

तुच सुगंधी साज आहे,

जिथे विसरावे स्वतःस वाटे,

तो आसमंत तुझाच आहे


माझ्या अंध पावलांना,

आधार तुझाच आहे

पावसाला गंध मातीचा अन्,

हृदयास तुझा आभास पुरेसा आहे


मृद्गंधाने खुणावलेली

ती ओढ तुझीच आहे,

तुझ्या सोबतीने गंधाळलेली

ती रात मधाळ आहे


खोल सारे प्रश्न संपले

रहस्य मात्र तू एक आहे,

तुझ्या आसवांत गवसलेली 

गुपिते मात्र अनेक आहे


मृद्गंध पावसाचा

अजूनी अंबरात आहे,

माझ्या हृदयी स्पंदनात तू

आजही खोल अंतरात आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance