STORYMIRROR

Atharv Mahajan

Others

3  

Atharv Mahajan

Others

विठ्ठल आलोक

विठ्ठल आलोक

1 min
410

पंढरीनाथा तुझ्या दारी

पहा ही भक्तीगंगा निघाली

स्मरणात तू, मुखात तू

धडकत्या ठोक्यांचे संगीत तू.


डोई टोपी ही छाया विठ्ठल

भक्तवेशी सुख विठ्ठल

मुखामुखातुनी उद्गार विठ्ठल

थिरकत्या पायी हा नाद विठ्ठल.


जाहले हे सत्य चिरंतर

ब्रम्हआनंद हा मुखी विठ्ठल

नाहले भक्तगण तुझ्या भक्तीने

धरूनी भेटीचा हा हट्ट.


नयन भक्तीचे अलगत झाकता

समोर आभास विठ्ठल प्रतिमेचा

नाम घेता माऊली तुझे अखंड

हि तल्लीन काया पहा डोलती धुंद.


बेधुंद होऊनी सारी दिशा

वर्षाधारी रिमझिम सरी बरसते

भास्कर किरणे पडती जेव्हा

जणू दवांवरती विठ्ठल आलोक परावर्तते.


चालती जरी अनवाणी पायी

दिसे चेहरी तो अलौकिक हर्ष

टाळ संगीताच्या मधुर साथीने

मुखामुखातूनी होई विठ्ठल नामाचा संघर्ष.


निशा निद्रेत, अट्टाहास हा मनी

दिसावे स्वप्नी विठ्ठल लोक

सुर्य पहिल्या किरणी

पडती नयनी विठ्ठल आलोक.


हे पंढरीनाथा, हे भक्तनाथा,

थांबेल तुझ्याच चरणी ही विश्वगाथा.


Rate this content
Log in