STORYMIRROR

Atharv Mahajan

Fantasy Others

3  

Atharv Mahajan

Fantasy Others

रातराणी तू, रातराजा मी.

रातराणी तू, रातराजा मी.

1 min
257

सांजसखी तू

सांजवेडा मी,

रातराणी तू

रातराजा मी.


सांज येते तार लेऊनी

आपुल्या होणार्‍या गाठींची,

ती सजते-सवरते आपल्यासाठी 

अन् घेऊन येते रात निराळी.


नक्षत्रांच्या वाटेवरती तुझ्या

ओढ माझी ती कसली,

लाज वाटूनी कधी झुकतो मी

कला माझी ती जगावेगळी.


या निसर्गाच्या खडग्यावरती

चादर माझी ती चंदेरी,

ह्या आकाशी लपेटलेली

झालर तूझी सौंदर्याची.


डोंगरासंगे नाचू गाऊ

आभाळाशी मारू गप्पा,

वार्‍यावरती स्वार होऊनी

सागरात पाहू रातआरसा.


ही रात आपले राज्य आहे

आपण इथले राजाराणी,

हुकूमत करू मर्जीने

अंताची चाहूल न लागे जोवरी.


सांजसखी तू

सांजवेडा मी,

रातराणी तू

रातराजा मी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy