STORYMIRROR

Atharv Mahajan

Romance Tragedy

3  

Atharv Mahajan

Romance Tragedy

कोण जाणे?

कोण जाणे?

1 min
324

कोणती असावी वाट ती,

जिथे आभास तुझा नसेल?

का कोण जाणे जगात ह्या

कधी असा श्वास तरी मिळेल?


तुझ्या सवे बरसातीचा,

का गंध पुन्हा पसरेल?

तुझी चाहूल नसेल ज्यात,

कधी मृद्गंध असा बहरेल?


तुझ्या परी सहवासाचा,

का रंग पुन्हा चढेल?

तुझ्यात ना पाहीला कधी,

सांग असा रंग कधी मिळेल?


तुझी सावलीही नसेल जिथे,

का असा वृक्ष मला मिळेल?

तुझा शृंगार नसेल ज्यात,

मला अशी कविता कधी स्फुरेल?


तुझ्याविना जगण्याचे,

मजला हे धाडस कधी जमेल?

का पुन्हा त्याच वाटेवरती,

मला हात तुझा मिळेल?


तू नसशील ज्यात कुठेही,

का कधी स्वप्न असे पडेल?

का कोण जाणे जगात ह्या,

कधी असा क्षण तरी मिळेल?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance