मी पुन्हा जगुन घेतो...
मी पुन्हा जगुन घेतो...
आसवांतले काही मी स्वप्ने वेचून घेतो,
काही क्षण दे मजला मी पुन्हा जगून घेतो.
आयुष्यात प्रेम नावाचा एक गुन्हा करून घेतो,
काही क्षण दे मजला मी पुन्हा जगून घेतो.
दारिद्रयाच्या काठावरती सुखाचा आर्जव करून घेतो,
काही क्षण दे मजला मी पुन्हा जगून घेतो.
स्फुरली जी कविता आधी काळजावर लिहून घेतो,
काही क्षण दे मजला मी पुन्हा जगून घेतो.
दे मजला दान श्वासांचे हृदयात माझा देश साठवून घेतो,
काही क्षण दे मजला मी पुन्हा जगून घेतो.
