STORYMIRROR

Atharv Mahajan

Tragedy Others

3  

Atharv Mahajan

Tragedy Others

आज अनवाणी...

आज अनवाणी...

1 min
274

आज अनवाणी पायाने

जरा सांभाळूनच जात होतो,

कधी कुठे काय येईल

कोणा काही ठाऊक नव्हते.


तीचं कॉलनी तोच रस्ता

तरीही तळपायाची बोटे आखडून चालत होतो,

त्याच रस्त्यावरती जरी पाऊले पडले सहस्त्र

आज अनवाणी तिथे

पाऊलही टाकण्या घाबरत होतो.


रस्ता तोंडपाठ होता

तरीही वाट मात्र चुकत होतो,

रस्त्याच्या प्रत्येक वळणावरती

पाय स्वतःचा वळवत होतो.


आज अनवाणी

रोजच्याच रस्त्यावरचे,

खडे, खड्डे, काटेही दिसत होते.

रस्ता अहो तोच होता,

पण आज दृष्टी पावलांची ती वेगळी होती.


काय सांगू आता तुम्हा 

चप्पलाची साधी जोडी नव्हती हो,

तरीही क्षणोक्षणी, पावलोपावली

पायच काय मीही रडवेला झालो हो.


कोणती गोष्ट मिळता सहजता 

त्याची किंमत नसते कधी,

तीच गोष्ट नसली कधी 

पंचायत गावभर होते नक्की.


चप्पल रोजचीच तर गोष्ट आहे

पण लक्ष कधी दिले नव्हते,

आज मात्र भासत होती ज्याची कमी

विनामुल्य वाटे अशी साधी चप्पल होती ती.


आज किंमत जाणता या दिवसाची

एक सत्य निरंतर डोई उलगडले,

गोष्टीची असता किंमत पैसे द्या

नसता किंमत तर जपणूक द्या.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy