STORYMIRROR

Dinesh Kamble

Tragedy

4  

Dinesh Kamble

Tragedy

पैंजण..

पैंजण..

1 min
26.1K


तूला आठवतो का तो क्षण

होत उल्हासित तुझ मन

नाजूक तुझ्या पायी जेंव्हा

मी गुंफली होती पैंजण.


ती घुंगरं किती किती

नाचत बागडत होती

तुझ्या प्रत्येक पावलावर

जणू गीत गात होती.


तो नांद किती किती

मनाला हवाहवा असा होता.

तो अनुभव जणू तुझ्या ही

पायांना नवानवा असा होता.


त्या माळरानावर फुललेल्या फुलांना.

केल होत घायाळ ज्यांनी.

ती पायतली तुझ्या च होती

पैंजण माझी राणी.


तुझी डौलदार चाल ती

मी वर्णु तो ताल किती

आता न राहिली मौज ती

झालीय मला बैमाण पैंजण ती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy