बळीराजा
बळीराजा
1 min
217
बळीराजा
शेती मध्ये राबतो बाप
घामाने भिजतो
दांडी मारून पावसा तू
का रे आमाले सतावतो
वाली नाही कोणी आमचा
तु तरी साथ दे
पेरलेल्या बियाले
तु अंकुर भुटू दे
इकून तिकुन पिकते पिक
भाव नाही पिकाले
सरकार असो कोणतही
येत नाही अश्रू पुश्याले
मार मारता डिंगा तुम्ही
लाज नाही नेत्याईले
तरी खचत नाही बाप माया
जगवतो जगाले
नाही पाहिजे मदत तुमची
ठरवू द्या आमच्या पिकांचा भाव आमाले
कृषिप्रधान देशात नको शेतकर्यांचा बळी
आता होऊ द्या खरा राजा आमाले