दारी उभा वसंत
दारी उभा वसंत
काहीच अर्थ नव्हता माझ्या भावनांना,
सांग फिरुन मजला का व्यर्थ झुरणे होते?
कित्येक जागविल्या रात्री सांगे तुजला,
पहाटेचा सुर्योदय मी नित्य पाहिला होता,
नव्हतो भणंग मी, नव्हतो फकिर मी,
दारी तुझ्या उभा मी वसंत पाहिला होता,
वाटते वाट पाहणे कधी संपणार नाही,
सुर्यास्तास वंदन मी रोजच केला होता,
काय पाहिलेस तिच्यात प्रश्न मनास पडला,
आसवांमागून खिन्नतेचा चेहरा राहिला होता.