पावसाचा नेम
पावसाचा नेम
इथे पावसाचा असा 'नेम' नाही,
माझ्या हर्षावर त्याचा 'क्लेम' नाही,
कधी रिमझिम, कधी वर्षाव,
अनाकलनीय स्वभाव कधी 'सेम'नाही,
भिजवी आश्रित, भिजवी दिलखुलास,
स्पर्शानंद,रोमारोमांत स्वछंद 'भेद'नाही,
उधाण सागरास अन् लुप्त किनारे,
झोंबणारे वारे पण 'अहम्' नाही,
काल खूप भिजलो,आज सुकलेला,
जीव सुखावलेला, काही 'हरकत'नाही,
शब्दात बांधणे आणि शब्दांत आत्मशोध,
काही'क्षम्य'नाही, सारे 'रम्य' नाही
