दुःख नको
दुःख नको
वाटतोस दुःख कशाला,
नाही कुणी सखा भेटला,
दशोदिशांत आकांत पसरला,
माझा आनंद चोरीला गेला,
कोण विचारेल तुजला भला,
तु सांत्वनाचा विचार केला,
बघ समय कलीयुगाचा आला,
स्वार्थात आंधळा न गमला,
नाही कुणी मित्र तुजला ?
नेहमी धावे तुझ्या मदतीला,
आहे श्रीहरी देई हाक त्याला,
पण नको वाटू दुःख दुसर्याला.
©सुर्यांश
