बघ पाऊस आलायं
बघ पाऊस आलायं


पाऊस आलायं, हौस भागवून घे,
बघ कसं मन मोरावानी फुलून आवयं,
पाऊस आलायं, मस्त भिजून घे,
बघ कसं वातावरण गंधाळून आलयं,
पाऊस आलायं, म्हणे पिऊन घे,
बघ कसं अमृत देवाकडून आलायं,
पाऊस आलायं शब्द पेरुन घे!
बघ कसं मन कवितेत बहरुन आलयं.