चर्चा खड्ड्यांची
चर्चा खड्ड्यांची

1 min

172
चर्चा तर होणारच खड्ड्यांची,
कोसळणार्या पावसाची
जीवावर बेतणार्यां..
वाहनांची,आणि माणसांची,
सत्तेतल्या राजकारणांची,
विरोधकांची विनाकारणांची,
फोटोंची, बातम्यांची आणि वाचकांचीही
तेवढ्यापुरतीच...पावसापुरतीच
पावसाळा संपला की सगळंच थांबेल..
परत पुढील वर्षापर्यंत...
सगळं मात्र तेवढ्यापुरतच..
हो तेवढ्यापुरतच.