तिळगुळ घ्या
तिळगुळ घ्या
तिळगुळ घ्या गोडगोड बोला,
पण खोटेपणाचा का बोलबाला,
तिळगुळ घ्या खरखरं बोला,
सत्य पचण्याचा का घोळ झाला,
तिळगुळ घ्या तोंडावर बोला,
पाठीमागे फार चुगल्या झाला,
तिळगुळ घ्या आज आता बोला,
उशीरा बोलण्याने गोंधळ झाला,
तिळगुळ तिळगुळ फार झाला,
सणासुदीचा आनंद वाढला
©सुर्यांश
