माझा बाबा
माझा बाबा


बाप माणूस होता माझा बाबा.
सकाळी सहाला घर सोडायचा,
रात्री दहाला घरी परतायचा.
कधी हू की चू नाही करायचा.
बराचसा त्रासायचा, थोडी घ्यायचा.
पण कधी हात वर नाही करायचा.
धाक तो काय आईचा.
खाऊ रोज बाबांचा.
@सुर्यांश
माझा बाबा होता नरम दिलाचा.
आतलाआत झुरला तो.
साधं एकटं गावाला जायचं,
तेव्हा डोळं भरुन जायचा.
लय जीव होता पोरांवर.
बिचारा त्रासला जाताना.
शिकवून गेला कसं जगायचं.
बाप होता मोठ्या मनाचा.
नेहमीचं येतो प्रसंग आठवणीचा.