माय सिंधु
माय सिंधु
अनाथांची माय सिंधु
हृदयाचा ठाव सिंधु
भावनांचा छळ सिंधु
सोसला अत्याचार सिंधु//
सामान्यांचा आवाज सिंधु
वासल्याचा भाव सिंधु
भाषेचा गोडवा सिंधु
कवितेचा पाडवा सिंधु//
साधेपणाचा आरसा सिंधू
जनकल्याणाचा वारसा सिंधु
स्वभिमानाचा लाव्हा सिंधु
आत्मशक्तीचा हिमाचल सिंधु//
अनेकांचा आधार सिंधु
कणखरतेचा करार सिंधु
माणुसकीचा एक हात सिंधु
करुणेचा अखंड सागर सिंधु//
नात्यातील एक धागा सिंधु
आश्रीतांतील आशा सिंधु
प्रकाशमय एक वाट सिंधु
स्री जीवनाच वास्तव सिंधु //