STORYMIRROR

Jairam Dhongade

Tragedy

3  

Jairam Dhongade

Tragedy

भंगला अभंग

भंगला अभंग

1 min
137


आठवाया आता । उरले न काही ।।

माणूस प्रवाही । फार झाला ।।१।।


लाभ तर संग । लोभाचेच अंग ।।

भलतेच रंग । दाखवितो ।।२।।


काय महामारी । आली घरोघरी ।।

माणुसकी सारी । हरवली ।।३।।


अडला नडला । अडतोच आहे ।।

सुदाम्याचे पोहे । संपलेले ।।४।।


भंगला अभंग । अवघे भणंग ।।

माणुसकी भंग । पावलेली ।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy