आंतरराष्ट्रीय महिला दिन
आंतरराष्ट्रीय महिला दिन
भेद अजुनही तसाच आहे.
प्रत्येक महिलेची वाट वेगळी!
आंतरराष्ट्रीय महिला दिन जरी
पातळी हरएकेची आगळी!
अजुनही महिलेचा एक वर्ग
रखडलेल्या अंधारात गुरफटलेला!
कुणाचा आधार घ्यावा
रोजचा प्रश्न डोक्यात अडकलेला
जीवनच असे परमात्म्याने घडविले!
प्रश्न चिन्ह आयुष्यात उभे राहिले
रोज भाकरीचा प्रश्न तो
देहाच्या चिंध्या करुन पोट भरले!
व्यापार देहाचा मांडून
मनावर विस्तवाची आग ठेवून
रोजच त्या जळत असतात
कण कण देह होरपळून!
विश्वच जगण्यापरी
काळोखातले वाटे
करुनी दार मनाचे खूले
अंतःकरणात जगणे दाटे!
नजरा रोखूनी पाहतात रोज
कितीदा चेहरे लपवावे
हितभर पोटासाठी मग
हातभर आयुष्य मागावे.!