थंडी गुलाबी
थंडी गुलाबी
वाहु लागले थंड वारे
तापमानात घट झाली!
धुक्याची रात्र सुरु झाली
अंगात बोचरी थंडी भरली.!
थंडी गुलाबी पसरली
गारठले अंग सारे.!
सुर्य किरणांशी करुया दोस्ती
थंडगार वाहती हे वारे.!
दिवसभर अंगात हुडहुडी भरली
उब नजरेतली आता सरली
चला शेकोटी रात्रीची पेटवुया
भयाण थंडीने रात्र विरली!
गारवा सारा वातावरणात भिणला
रस्ताही आता निर्मनुष्य झाला!
गरीब बिचारे जण ते
एकच कपडा अंगावर त्यांच्या उरला!
थंडी ही गुलाबी चोहीकडे दिसे
अंधारात जनावरे उभे कसे
पहावे चेहरे केविलवाणे त्यांचे
आकाशातुन चंद्र हा हसे..!
