अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊस
येतो अवकाळी पाऊस
सारे स्वप्न विस्कटून टाकतो!
जमिन घामाने सिंचन करुन
पेरणी सारी वाहुन नेतो...!
काय त्या पावसाला माहित
जाणले का गरिबांचे त्याने हित
शेतकरी नशीबरुपी वहित
बसतो मग रक्ताच्या थेंबानी वहित!
पिकं डोकं वर काढतांना
अवकाळी पाऊस नजरेत भरतो
मध्येच बेमोसम मेघांच्या सरी
धरणीवर तो पाऊस पाडतो..!
काय भेटते देवाला असे करुन
कोणालाही नसे ठाव.!
अवकाळी पावसात डुबतांना
मी पाहिली आयुष्यात माझ्या कित्येक गाव!
ऐन फुलावर येतेय
ती पर्हाटीची कळी.!
आणि मग पडतो
पाऊस अवकाळी.!
आकाशातून नाही
पडत मेघांच्या मग सरी!
बळीराज्याच्या डोळ्यातून
परत येतात त्या माघारी!
बळीराजाचे दु:ख
तोच फक्त जाणतो.!
कुणालाही सहभागी न करता
एकटाच आयुष्यभर तो कण्हतो..!
