पुस्तके
पुस्तके
पुस्तके असतात मित्र
ज्ञान देतात ते सर्वत्र
जे मैत्रीस असतात पात्र
त्यांचेच पुस्तक बनतात मित्र!
जेव्हा सगळ्यांनी
तुम्हाला दुर सारले.!
पुस्तकांनी जवळ केले
ज्ञान व मनोरंजन दिले.!
एकांतात बोलू पुस्तकाशी
अविरत हितगुज करुया!
मन आपले मोकळे करुन
आनंदाचा आस्वाद घेऊया!
ज्ञानाची कक्षा वृंदाविते
सुगंध स्नेहाचा फुलविते
पुस्तकातून जग कळते
जीवन आपले सक्षम होते..!
