श्रावणसरी
श्रावणसरी
आला श्रावण श्रावण
पावसांच्या सरीने धरा झाली पावन!
सारी सृष्टी ओलेचिंब झाली
तुडूंब भरली जलाशये, हिरवे झाले वन!
हिरव्या शालुत सृष्टी बहरली
वाळलेल्या झाडांनाही पालवी फुटली!
बळीराजा मनोमन सुखावला
आनंदाची लहर त्याच्या मनी दाटली!
फुलला मग हिरवा ऋतु
फुलांच्या झाडांनाही छान बहर आला.!
काळ्या आईची तृष्णा भागली
चैतन्याचा वारा सर्वत्र वाहु लागला.!
पहाटेला शांत शितल गारवा
तेजोमय किरणासवे आल्हाद देई!
पावसाच्या सरीमध्ये राघु-मैनाही
मनसोक्त धुंद होऊन चिंब होई!
आला श्रावण श्रावण
सखी-सहेली श्रावणात एकत्रित झाल्या!
श्रावणाचा झुला झुलत त्या
गाणी श्रावणाची गात पावसात न्हाल्या!