माझी शाळा
माझी शाळा
होता बालपणीचा काळ सुखाचा
शाळेत पाय टाकला पहिल्यांदाच!
घरापासून दूर आईला सोडून
सारे नवखे होते जगच ॥१॥
करण्यासाठी अक्षर ओळख
आकड्यांची तोंड ओळख!
शाळेत मला आईवडीलांनी पाठविले
प्रकाश ज्ञानाचा घेऊन मिटविण्या काळोख॥२॥
शिक्षक माझे ज्ञानवंत गुरु
एक एक अक्षर पाटीवरी गिरवुन घेई!
मायेने माझ्या बालमनाला कुरवाळुन
प्रेमाने मज ज्ञान देई॥३॥
शाळा माझी ज्ञानाची गंगा
ज्ञानाच्या गंगेत मी उडी मारली!
लेखणी हाती घेऊन
एक एक अक्षरे गिरविली॥४॥
शाळेचे होते माझ्या विस्तीर्ण आवार
मित्र- मैत्रीण तिथे मिळाले फार!
गट्टी जमली माझी त्यांच्याशी छान
मनाला रोज मिळे आधार॥५॥
ज्ञानाची ज्योत सदा शाळेत तेवत राही
सरस्वती वंदना,राष्ट्रगीत,प्रार्थना रोज होई!
संस्काराचे बीज मज शाळेतुन मिळाले
आई रोजच गृहपाठ घरी घेई॥६॥