बुध्द जयंती
बुध्द जयंती
बुद्ध गयेचा शिल्पकार
सार्या विश्वाला शांतीचा दिला संदेश.!
सत्य,अहिंसा,शांतीचा मार्ग दाखविला
पावन झाला भारत देश..!
शेकडो वर्षांपुर्वी राजकुमार सिध्दार्थनी
मोठ्या राजघराण्यात जन्म घेतला!
सोडुनी राजपाट, सुख,संपत्ती
बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करुन ज्ञानमार्ग पत्करला!
शिकवण त्यागाची व शांतीची देऊन
संदेश एकात्मतेचा दिला.!
शोध खऱ्या धर्माचा करुन
बुद्ध जगाला खरा दिसला!
