कृषीदिन
कृषीदिन
घामाचे करुनि सिंचन
मातीत गुंतवितो मन
काबाडकष्ट करून
जमिनीत फुलवे नंदनवन!
नांगर चालवितो
जमिनीची मशागत करतो!
बैलजोडी खिल्लारी त्याची
तो हंगामी पिकं काढतो!
कष्टासाठी नाही कधी भित
पावसाशी व कष्टाशी असे हारजीत
खुप दिवसरात्र राबतो
मोती पिकवुन हिरवे करतो शेत!
मुलांचे शिक्षण व पालनपोषण
होते सावकाराकडून शोषण
निर्दयी नसे त्याचे मन
जवळ त्याच्या फक्त हिरवे धन!
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
