STORYMIRROR

Mohan Somalkar

Inspirational

3  

Mohan Somalkar

Inspirational

कामगार

कामगार

1 min
195

कामगार मी कामगार 

मेहनत आणि कष्टाचे आहो मी आगार!


अंगावर घेऊन कष्टाचा भार

वाहते शरीरातून कष्टरुपी घामाची धार!


जन्म जाहला माझा कामाला देण्यास आकार

हातात सदा काम असावे हेच आहे मला स्वीकार.!


मातीत राब राब राबुनी उन सोसतो अपार

कधी जीवनात घेत नाही मी माघार!


मेहनत करुन जीवन जगण्याचे जाणतो मी सार

हाती काम नसले की, होतो मी बेजार.!


मालकाशी सदा राहुन मी ईमानदार

कितीही त्रास घेण्यास असतो तयार!


कधी ना थांबलो, पुढेच जाऊन केला विचार 

जीवनात लोभ केला नाही मी कधी फार!


बनुनी प्रगती व यशाचा कणा, पाऊले चाललो चार

झालो नेहमीच मी माझ्या कुटूंबाचा आधार!


उन, वारा, पावसातही सोसत राहिलो मार

दृढ संकल्प व ध्येय गाढुन मार्ग केला पार!


कामगार मी कामगार 

मेहनत आणि कष्टाचे आहो मी आगार.!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational