आवड
आवड
छंद मनातले जोपासावे
छंद माणसाला जिवंत ठेवते
त्याच्याविना मर्म जगण्याचे
माणसाला कुठे हो कळते
नसेल कुणी सोबती जरी
एकटाच जरी असेल वल्ली!
कंटाळवाणे होईल जगणे
छंदातून जिवंत मी हल्ली!!
वर्तमानपत्र वाचणे,कथा वाचणे
लिखाण, बागकाम करणे
छंदातुनच माणसाची आता
खरी ओळख ती उरणे.!!
रिकामे बसण्यापेक्षा
स्वतःला कार्यशील ठेवा!
तुमच्यातील कलागुणांना
वाव देऊन करुद्या जगाला हेवा!!
छंदातून होतो माणसाचा विकास
नवे काही करण्याचा लागतो ध्यास
छंदच आपली संपत्ती समजावी
दुसऱ्या गोष्टीचा नको तो हव्यास!!
मोहन सोमलकर नागपूर
