उदास वाटते आज
उदास वाटते आज
उदास वाटते आज जरा भकास वाटते आज
अनामिक ती वाटे हुरहुर
ना कळे त्याचे कारण
शांत बसावे ,स्वत:त रमावे
कुणा सवे ना काहि बोलावे
येता कोणि मज जवळ मजला
नको वाटते आज
जरा उदास वाटते आज ,जरा भकास वाटते आज
उगाचच येती अश्रू दाटून हे नयनी
उगाचच मग घसा कोरडा होतो
उगाचच असतो त्रागा कसला &nbs
p;
जीव बावरा होतो
नकोसा मग जीव ही होता
संपवून तो टाकावा वाटतो
नको वाटते असले जगणे
कसल्या छायेत भितीच्या
मनाचा ही ठाव लागेना
काय सलते या मनाला
उगाचच हे उदास वाटने
संपून जावे असेच जगणे
जरा उदास वाटते आज ,जरा भकास वाटते आज