दुसरं काही नाही
दुसरं काही नाही
तुझं प्रेम माझ्यासाठी
भ्रम आहे
दुसरं काही नाही
ज्याचं फळ मिळणार नाही
असं श्रम आहे
दुसरं काही नाही || 0 ||
विनाकारण वेड्यासारखं
प्रेमात मूर्ख बनत आलो
माहित असतानाही स्वतःला
मुर्खात मी गणत आलो
ज्याची गणती सर्वात शेवटी
असा क्रम आहे
दुसरं काही नाही
ज्याचं फळ मिळणार नाही
असं श्रम आहे
दुसरं काही नाही || 1 ||