शोधू कुठे आई तुला?
शोधू कुठे आई तुला?
1 min
196
आई मला तुझी ग ......
येते आठवण .....
दाटून येते मन
आई तुझीयाविन
तुझी ती माया
तुझा जिव्हाळा
आज आठवतो आहे, क्षणा-क्षणाला
नव्हते वाटले तुझ्याविना,
आयुष्य जगावे लागेल
मायेला तुझ्या,पोरके व्हावे लागेल
गेलीस कुठे ग आई....
डोळे माझे, तुलाच शोधत आहेत....
तुझ्या छत्र-छायेखाली आजही राहायचे आहे
सगळे पुरविलेस हट्ट तु ग....
हट्ट एक पुरवशील का ग ?
एकदा, फक्त एकदा हाकेला माझ्या साद देशील का ग.....
आई मला तुझी ग....
येते सगळे....
दाटून येते मन...
आई तुझ्याविन.....