पैशाच्या तराजूत
पैशाच्या तराजूत
1 min
155
नकॊ तोलू प्रेम माझं
पैशाच्या तराजूत सखे
नाही इथे राहत सदा
सतत आणि शाबूत सखे || 0 ||
आज आहे उद्या नाही
प्रत्येक गोष्ट अशीच इथे
कल्पनेतही दृष्टी आपली
जाणार नाही कधी तिथे
वेळ आणि काळ नाही
कोणाच्याही काबूत सखे
नाही इथे राहत सदा
सतत आणि शाबूत सखे || 1 ||
प्रेमाचीही या जगी
एक्स्पायरी डेट असते
मनासारखी येणारी
प्रचिती लेट असते
चिरकाल इथे नाही काही
सर्वच अनाहूत सखे
नाही इथे राहत सदा
सतत आणि शाबूत सखे || 2 ||