अपेक्षा...
अपेक्षा...
ठरवतो असे आपण अनेकदा
आता कुणा कडुन काही अपेक्षा ठेवायच्या नाही
आपलं माणुस म्हणुनही कुणावर हक्काने रुसायचं नाही...
कुणाला आपली किंमत नाही म्हणून झुरत बसायचं नाही...
पण तरीही काही गोष्टी पुन्हा पुन्हा आपणच
गिरवत बसतो..
ज्यांच्यासाठी मन आपलं झुरतं
आयुष्य आपलं खपतं
त्यांना आपली काडीची नाही खंत
या गोष्टीचा विचार करून काळीज थोडं तुटतं
कधीतरी भासेल त्यांना आपली कमी
आशेने वेडं मन पुन्हा त्याच माणसांच्या मागे पळतं..