खरं सांग भावा तू गावासाठी...
खरं सांग भावा तू गावासाठी...
आनंद झाला आम्हा तू साहेब झाला
तुझ्या त्या पदाचा गावाला काय उपयोग झाला..
खरं सांग भावा तू गावासाठी काय केला.
आज आहे तुझ्याकडे अलिशान ती गाडी
त्यामध्ये बसून कधी गरीब मित्राला तू नेला..
खरं सांग भावा...
ज्या शाळेत शिकून साहेब तू झाला
आठवते का रे कधी शाळा ती तुला..
खरं सांग भावा..
खूप आहेत अजून कुणी नाही ज्याला
पूर्वीचे दिवस कधी आठवतात का रे तुला..
खरं सांग भावा..
तुझ्या त्या यशामध्ये ज्यांची साथ होती तुला
त्याचा असा कसा विसर तुला झाला..
खरं सांग भावा..
ज्या शाळेत शिकला जीनं घडवलं आपणाला
जमलं तर बघ काही करता आलं तर तुला..
खरं सांग भावा..
ज्या मातीत जन्मला तिचा सुगंध तुला
तिचं ऋण आपल्यावर विसरु नको मुला..
खरं सांग भावा...