STORYMIRROR

Anand Yedpalwar

Others

3  

Anand Yedpalwar

Others

आई मला हे जग पाहू दे

आई मला हे जग पाहू दे

1 min
489

आई मला हे जग पाहू दे

विनवणी तूला करते आई

नाही लागत मला काही

मला जन्माला येऊ दे

आई मला हे जग पाहू दे.

बनेन तुझी लाडाची लेक

असेल मी लाखात एक,

कल्पना चावला मला होऊ दे

आई मला हे जग पाहू दे.

नाही मिळाले काही जरी

करणार नाही तक्रार तरी,

उपाशी मला तू राहू दे

आई मला हे जग पाहू दे.

जरी मी नसेल घराचा वारस

असेन मात्र नक्कीच पारस

दुःख सावरण्या मला येऊ दे

आई मला हे जग पाहू दे.

नका करू माझा पोटात अंत

बनेन जिजाऊ, मिराबाई संत

रांगेत मला त्या जाऊ दे

आई मला हे जग पाहू दे.

जरी मी असेल इतरांचे धन

जपेन मी सर्वांचे मन,

हास्य मला दोन्ही घरी ठेवू दे

आई मला हे जग पाहू दे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन