Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anand Yedpalwar

Inspirational

4.0  

Anand Yedpalwar

Inspirational

जगी होता एकच राजा...

जगी होता एकच राजा...

1 min
376


रयतेच्या कल्याणा झिजवला

देह आपला सारा,

म्हणूनच होता राजा माझा

देशाला तो प्यारा.


महाराष्ट्राच्या मातीत जन्मला

जिजाऊचा तेजस्वी तारा.

वाघाची चाल, गरुडाची नजर

शौर्य स्फूर्तीचा तो झरा.


जगी होता एकच राजा

प्रजेचे दुःख जाणणारा,

आचरणातून दाखवून दिले

परस्त्रीला आई मानणारा.


शौर्य पराक्रमाचा महामेरू 

शिवबा साहसाची मूर्ती,

असा होता एकच राजा

ज्याची जगभर होती किर्ती.


त्रस्त शत्रूला करणारा

हार कधी न मानणारा,

मरण आले तरी चालेल

शरण कधी न जाणारा.


महा पराक्रमी रणधुरंधर

जसले जिजाऊंच्या पोटी,

शिवाच्या कार्याला करतो

मनोभावे वंदन कोटी कोटी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational