STORYMIRROR

Anand Yedpalwar

Others

3  

Anand Yedpalwar

Others

जगी होता एकच राजा

जगी होता एकच राजा

1 min
145

रयतेच्या कल्याणा झिजवला

देह आपला सारा,

म्हणूनच होता राजा माझा

देशाला तो प्यारा.


महाराष्ट्राच्या मातीत जन्मला

जिजाऊंचा तेजस्वी तारा,

वाघाची चाल, गरुडची नजर

शौर्य स्फूर्तीचा तो झरा.


जगी होता एकच राजा

प्रजेचे दुःख जाणणारा,

आचरणातून दाखवून दिले

परस्त्रीला आई मानणारा.


शौर्य पराक्रमाचा महामेरू

शिवबा साहसाची मूर्ती,

असा होता एकच राजा

ज्यांची जगभर होती किर्ती.


त्रस्त शत्रूला करणारा

हार कधी न मानणारा,

मरण आले तरी चालेल 

शरण कधी न जाणारा.


महा पराक्रमी रणधुरंधर 

जन्मले जिजाऊंच्या पोटी,

शिवबाच्या कार्याला करतो

मनोभावे वंदन कोटी कोटी.


Rate this content
Log in