उघड रे पावसा
उघड रे पावसा
1 min
132
उघड रे पावसा
उघडरे पावसा
घे थोडा विसावा,
अधूनमधून ये गडे
निरंतर तू नसावा.
थोडं थोडं बरसला
आनंद गड्या वाटतं
तुझ्या अति येण्याने
नशीब आमचं फाटतं.
थांब रे पावसा
ऐक आमचं जरा,
आम्हा सर्वांना मिळू दे
अन्न आणि चारा.
तु जर का रूसला
नद्यांना येईल पूर,
जवळचे रे आपले
सर्व जातील दूर,
अति तुझ्या पड़ण्याने
वाहनांची रांगच रांग,
आम्हाला छळवण्याने तुला
बरं वाटते का सांग?
