STORYMIRROR

Anand Yedpalwar

Inspirational

3  

Anand Yedpalwar

Inspirational

तुम्हा करीतो प्रणाम

तुम्हा करीतो प्रणाम

1 min
225

लढण्याचे बळ देवून 

विखुरलेल्यांना एक केले,

बाळासाहेंबासारखे राजे

जगी कुठे नाही झाले.


ज्यांचे नाव घेण्याने

रक्तात ऊर्जा निर्माण होते,

काय जादू होती

करोडो लोक नाव घेते.


लोकप्रियतेचे उत्तम उदाहरण 

म्हणजे बाळासाहेब ठाकरे,

एकच बाळासाहेब जगी

करोडो त्यांची पाखरे.


नव्हते केवळ पुढारी

होते ते व्यंगचित्रकार, 

लेखणीतून आपल्या केलं

भल्याभल्यांना ते गार.


बाळासाहेबांचे हिंदुत्व हे

कधीचं नव्हते सोंग,

मैत्रीच्या नावाखाली धोका

हे कधीच नव्हते ढोंग.


अभिजात सौंदर्यदृष्टी होती

अगम्य ती कल्पनाशक्ती,

उगीच करत नाहीत 

करोडो लोक मनोभावे भक्ती.


विझलेल्या चुली पेटविल्या

रिकाम्या हाता दिले काम,

वंदनीय बाळासाहेबजी

तुम्हा करीतो प्रणाम....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational