STORYMIRROR

Anand Yedpalwar

Inspirational Others

4  

Anand Yedpalwar

Inspirational Others

..........सेवा..........

..........सेवा..........

1 min
275

अनमोल जन्म लाभला

विसरू नको मानवा,

कृतार्थ करू या जन्मा

करूनी आपण सेवा.


कष्ट आणि सेवा

यातच खरे सुख,

ध्येयवेडे त्यांना 

लागत नाही भूक.


आईवडील गुरुजनांची

नित्य करू या सेवा,

हाच आहे खरा

सुखी जीवनाचा ठेवा.


घास भरू भूकेल्यांना

हीच खरी सेवा,

सदबुध्दी दे सर्वा

हीच मागणी देवा.


जाणे आहे रिकामेच

नित्य ध्यानी ठेवा,

होईल तेवढी घडू द्या

आपल्या हातून सेवा.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational