रंग पंचमी...!
रंग पंचमी...!
रंगपंचमी स्वप्नवत झाली
रंगांची मजाच जणू हरपली
धुळवड चिखलफेक
तेवढीच आता उरली
आनंदाची वर्ष कशी
जणू भूर्रकन सरली
पूर्वी तोफा दणाणल्या
की एकाहून एक सरस दणाणायच्या
मुलूखमैदान तोफेची
आठवण करून द्यायच्या
आता सारे हंडगे बार
नुसता फुकाचा डोक्याला खार
अन निव्वळ खोटा सोपस्कार
ना मीठ ना तिखट
सप्पक सारा संसार
तू ला तू मी ला मी
स्वार्थाचा नुसता हुंकार
काय राव सारी रयाच गेली
उण्या दुण
्याची उबळ आली
नको नको ती खोगीर भरती
वाटले का करावी मग आरती
ना ठाव ठिकाणा आचाराचा
ना ठाव ठिकाणा विचाराचा
ना ठाव ठिकाणा संस्काराचा
वाटले असा नेता रे काय कामाचा
शांतताच मनाची भंग पावली
तेंव्हा कोठे अंतरास जाग आली
म्हंटल संकल्पाची वेळ झाली
विचार करूनच मज भोवळ आली
देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती
म्हणता म्हणता
अति तेथे माती आठवली
आणि
जुन्याच आठवणींची मग
सुखद रंगपंचमीच मनी साठवली....!