अपघात... एक काळरात्र
अपघात... एक काळरात्र
काल रात्री झाला एक अपघात अन् दुनिया झाली होत्याची नव्हती
परत एकदा जाणवली जीवनाची क्षणभंगूरता आणि
समजले, जीवनाची नाही काहीच शाश्वती
कितीही घ्या विमा पाॅलिसी, अपघाताचा उतरवा विमा
आयुष्याचा दोर तुटताच ,पार करावी लागते जीवनसीमा
बोलावून घेतो जेव्हा परमेश्वर,
तेथे गणित उपयोगी येत नाही वयाचे
परमेश्वराचे आमंत्रण आलेच,
तर निमित्तही पुरते अपघाताचे
आई वडील, सगेसोयरे , सोबती
जमले जरी अनेक
रक्तदान, ईश्वर प्रार्थना
कामी येत नाही काहीच विवेक
जाणारा निघून जातो
अश्रू उरतात मागे
केवळ तसबिरीला हार घालून
आई मिळवते जगण्याचे बळ
देवा, थांबव ना रे हे अपघात
तारुण्याच्या उंबरठ्यावर
कशाला हवा हा उत्पात
वयानुसार लाव एकेकाची वर्णी
तोपर्यंत जीवन जगू दे आनंदात!