मित्राचा बाप
मित्राचा बाप
खऱ्या अर्थाने आज सूर्यास्त झाला
ज्या सूर्याने जन्मा घातले
पालन पोषण करून वाढविले
अथांग समुद्राचे पाणी आज आटले
आजच्या या कलियुगात
तूच आहेस मित्रा श्रावण बाळ
बारा वर्षात घेतलेली काळजी
हरवलं शेवटी तुला घेवून गेला काळ
वडिलांची घ्यावी काळजी
करावा कसा सांभाळ
हे तुझ्याकडून शिकावं मित्रा
शेवटी फाटलं प्रेमाचं आभाळ
आता तू मात्र तुला सांभाळ
आता तू मात्र तुला सांभाळ
