ती
ती
आहे का अस्तित्व खरे तिला
सोसतेय तीच अविरत हाल
संसार सुखासाठी बिचारीचे
तिच्या सुखाचे होते बेहाल...१
कधी ती चपला चमकणारी
कधी तुलना तिची चपलेशी
करीत निर्मिती या जगाची
सारी मुले तिला आपलीशी ...२
कधी कंठते दुःखाचे घोट कडू
कधी सांगते ही व्यवस्था तोडू
जगायला देतो का रितीरिवाज
येणा-या मुलींसाठी येतेय रडू...३
करी वसा तो सुखी संसाराचा
खरा प्रितीचा तो महासागर
भवसागर तरत अपमानाचा
उच्च शिक्षित असो वा निरक्षर...४
पावले कितीही अडवली कुणी
पोचली ती उंच अवकाशावरी
होत पंतप्रधान ती या भारताची
राष्ट्रपती पदही असे तिच्या करी...५
विद्वान आई ती शिक्षिका पहिली
चालणे बोलणे संस्कार किती थोर
माय माऊली वीना सुने दार घराचे
विसरून चालेल कसे ते उपकार...६